कळेना करावे काय
घेऊ कुठे मी धाव ।
संकटांशी लढता लढता
झालेत मनावर घाव ।
शोधू कुठे वाट आता
लागेना कुठेच ठाव ।
बघतो मी आकाशात
उरला शेवटाचा डाव ।
Sanjay R.
जीवाला लागलाय जीव
झाला तो सजीव ।
दुरून बघतो जो कोणी
वाटे तो निर्जीव ।
म्हणून दगड तू त्याला
दूरच जरासा ठेव ।
मनात ज्याच्या आस
बघायचा त्याच्यात देव ।
Sanjay R.
तुझ्या माझ्या मैत्रीचा बंध
त्याला बालपणातला गंध ।
दरवळतो अजूनही सुगंध
त्यातच होते मन माझे धुंद ।
जडला आज मला छंद
आठवतो जेव्हा मिळतो आनंद ।
Sanjay R.
आहे दर्शनाची आस
मनातही आहे ध्यास ।
कृपा तुझीच देवा
घेतोय मी श्वास ।
करील मीही वारी
होऊ दे कितीही त्रास ।
चरणाचे होईल दर्शन
मनातही हा विश्वास ।
Sanjay R.
मैत्री ला नाही तोड
फक्त एक छोटासा जोड ।
तोडून कुठे तुटते
मनाची तीच तर खोड ।
मैत्री केली जिवाभावाने
घ्यायचे नाही लोड ।
घट्ट होतात धागे मनात
मागतो कोण परतफेड ।
Sanjay R.