मोबाईलच माझा बेस्ट फ्रेंड
दिवस रात्र असतो सोबत ।
सुखात दुःखात देतो साथ
जीवन माझे तोही असतो जगत ।
अडीअडचणीत सुचवी मार्ग
बघतो त्याला मी नकळत ।
मित्रहुनही वाटतो आपला
मीही त्याला नाही टाळत ।
Sanjay R.
आठवणीत ती सारी गाणी
गुणगुणतो मी माझ्या मनी ।
मनात भरतो उल्हास आनंद
शब्द गाण्यांचे पडताच कानी ।
Sanjay R.
सर सर येऊन
गेला पाऊस ।
भिजले अंग
झाली हौस ।
ओल्या मातीचा
गंध सुटला ।
झाडावरचा
पक्षी उठला ।
जाऊ कुठे
मी धावू कुठे ।
काही सुचेना
गाऊ कुठे ।
Sanjay R.
श्रावणातला दिवस भारी
उन्हात पडतो पाऊस ।
खाण्याची असते चंगळ
फिटते सर्यांचीच हौस ।
नागपंचमी रक्षाबंधन
सणांचेच हे दिवस
जिकडे तिकडे आनंद
निसर्गही असतो सरस ।
फुलांना येतो बहर
रंग उधळतात सारे ।
रात्री फुलते आकाश
तिमतीम करतात तारे ।
श्रावणाची मजाच वेगळी
जिकडे तिकडे आनंद ।
बघून हिरवळ सारी
मनही होते धुंद ।
Sanjay R.
भावना या मनात
आठवणीतही कोणी ।
अव्यक्तच सारे
मन सारेच जाणी ।
कधी होतो व्यथित
आठवे कहाणी ।
हुंदका गळ्यात आणि
डोळ्यात पाणी ।
Sanjay R.