आठवतात ते जुने दिवस
बालपण होते किती सरस ।
असेल जायचे मामाच्या गावी
झुकझुक गाडीची आठवण यावी ।
कुक कुक तिची शिट्टी वाजे
नेई साऱ्यांना गरीब असो वा राजे ।
बसायचे मस्त खिडकी पाशी
धावणारी झाडे द्यायचे खुशी ।
Sanjay R.
गावी जायला एकच गाडी
बसेना कोणी चाले टवाळी ।
म्हणे कोणी भूत असतात
एकटे पाहून मगच दिसतात ।
एकदा मी8 बसलो गाडीत
दिसले भूत होते ते साडीत ।
भीतीने फुटला घाम अंगाला
गाडीचा वेग आला रंगाला ।
गाव येताच थांबली गाडी
बाई पण उतरली होती जाडी ।
निघालो मी मग गावाकडे
मागे मागे ती आणि मी पुढे ।
भीतीने पाय लटलट कापे
विचार डोक्यात छातीही हापे ।
झपझप चालत आलो गावात
तीही गेली मग बाजूच्या घरात ।
कळले मग ती पाहुणी होती
चुपच बसलो गेली मग भीती ।
Sanjay R.
मोगरा फुलला
घेऊन सुगन्ध ।
संथ झाला वारा
दरवळला गंध ।
हळुवार श्वास
वाहे मंद मंद ।
मन माझे झाले
कसे धुंद बेधुंद ।
नजर शोधते
लागला छंद ।
सुटला मनाचा
हळुवार बंध ।
वारा झाला धुंद
मीही बेधुंद ।
अंतरात भरला
मोगऱ्याचा गंध ।
Sanjay R.