सरतो दिवस जेव्हा
वाटते उदास ।
आठवण येताच मग
संथ होतात श्वास ।
थांबतात विचार सारे
लागतो मनाला ध्यास ।
उतरेना गल्या खाली
दोन सुखाचे घास ।
तळमळत जाते रात्र
स्वप्नांचा सारा आभास ।
मिटतो गच्च डोळे
भोगतो फक्त त्रास ।
Sanjay R.
सांजवेळ होता
थांबवेना घरात ।
मन आत बाहेर
येरझारा होतात ।
गप्पांचा भरे अड्डा
मित्र सारे जमतात ।
चुकत नाही वेळ
सारेच भेटतात ।
निघे सारा थकवा
उत्साह भारतात ।
मित्रांची मैत्री बघा
मैत्रीसाठी जगतात ।
Sanjay R.
ओली ही सांजवेळ
सरसर पडतात सरी ।
आकाशाने पांघरली
ढगांची ओली दरी ।
भिजली धरा त्यात
ओल्या मातीची जरी ।
सळसळ वाऱ्यासंगे
नाचते हिरवी परी ।
सूर्यास्ताची वेळ झाली
सूर्य पोचला अपुल्या दारी ।
दूर मंदिरात वाजे घंटा
नाद उठला जय जय हरी ।
Sanjay R.