Monday, August 1, 2022

जीवाची तगमग

थांबला आता पाऊस
शेतात कामाची लगबग ।
पिकांचा झाला नासोडा
सांगा पिकेल काय मग ।
मेहनत पैसा गेला वाया
जीवाची होते तगमग ।
अमदा पोट भरायचे कसे
छातीत होते हो धगधग ।
Sanjay R.

रंगांची दुनिया

अजब ही दुनिया
यात रंग किती ।
आचार विचार वेगळे
कुठे द्वेष कुठे प्रीती ।

रंग जिथे काळा
थोडी वाटते भीती ।
अवकाशात बघतो
अंतापूर्वीच इति ।

रंगात रंग मिळता
आगळी वेगळी स्थिती
प्रारब्धाचा खेळ सारा
अजब निसर्गाची नीती ।
Sanjay R.


Sunday, July 31, 2022

तुझं माझं

तू आग मी पाणी
चित्र तू मी वाणी ।
काळ्या पाटीवर
उमटते लेखणी ।
अवतरते तू कशी
शब्दांची कहाणी ।
शोभते जशी मलाच
माझी म्हणून रागिणी ।
सुंदर या माळेतला
मौल्यवान तू मणी ।
तुझं माझं जमेना
बघ क्षणो क्षणी ।
Sanjay R.


आकाशाला हात

करू कशी सुरुवात
टेकेना आकाशाला हात ।
आभाळ टाकायचे सारून
पावसाने केला घात ।
निसर्गाने दिले जीवन
जन्मोजन्मीची ही साथ ।
पाण्याविना कठीण सारे
देईल पाऊसच मात ।
Sanjay R.


रात्र

रात्र असते अंधाराची
सत्ता सम्पते दिवसाची ।
सूर्य होतो नजरेआड
अवतरते छवी चंद्राची ।
चांदण्यांचे चाले नृत्य
चढते नशा अंधाराची ।
हळू हळू सरतो होश
चाहूल लागते सूर्याची ।
पहाट होता रात्र सरते
सत्ता सुरू दिवसाची ।
Sanjay R.