Thursday, July 28, 2022

कुठे पैशाचा अंबार

कुठे पैशाचा अंबार
कुठे फक्त अंधार ।

कोणी इथे निराधार
शोधतात आधार ।
बघा त्यांचे आचार
जीवन ज्यांचे लाचार ।
कुठले हे असे विचार
गेलेत कुठे सुविचार ।
सांगा किती हा भार
करेल का कोणी प्रहार ।
Sanjay R.


बांधते दुःखाशी गाठ

झेलून मी दुःख
बघतो सुखाची वाट ।
सुख दुरून जाते
बांधते दुःखाशी गाठ ।

बघतो जेव्हा जेव्हा
सुखाचा तिथे मी थाट ।
जणू सागराचा किनारा
जाते घेऊन सारेच लाट ।

सरी श्रावणाच्या येता
झुळझुळ वाहे पाट । 
शोधू कुठे मी आता
सुंदर तोच तो काठ ।
Sanjay R.


बदला

घेतो कशाचा तू बदला
नाही मार्ग कुठे मधला ।
नशिबाचे भोग सारे
कोण यातून सुटला ।
हास्य जरी असेल गाली
पापण्यात थेंब दडलेला ।
न कळे अंतराची व्यथा
दिसतो कुणास रडलेला ।
Sanjay R.

काळोख

दुःख जन्माचे भोगतो
जीवन पिंजऱ्यात जगतो ।

नाही मोकळे आकाश
दिसतो काळा प्रकाश ।

वाटते भय आकृत्यांचे
वसले काय डोळ्यात ।

अंतरात होते धडधड
हुंदका दाटला काळजात ।
Sanjay R.


Wednesday, July 27, 2022

गोड तुझे अभंग

भक्तीत तुझ्या रे मी
आहे असा दंग ।
गेलो मिळून अवघा
झालो एक रंग ।
वाटे ठाई तुझ्याच
राहावे संग संग ।
गावे सदा तुझेची
गोड तुझे अभंग ।
स्मरण तुझेची होता
मीही व्हावे पांडुरंग ।
विठ्ठल विठ्ठल जपावे
नामात व्हावे दंग ।
Sanjay R.