Thursday, July 28, 2022

काळोख

दुःख जन्माचे भोगतो
जीवन पिंजऱ्यात जगतो ।

नाही मोकळे आकाश
दिसतो काळा प्रकाश ।

वाटते भय आकृत्यांचे
वसले काय डोळ्यात ।

अंतरात होते धडधड
हुंदका दाटला काळजात ।
Sanjay R.


Wednesday, July 27, 2022

गोड तुझे अभंग

भक्तीत तुझ्या रे मी
आहे असा दंग ।
गेलो मिळून अवघा
झालो एक रंग ।
वाटे ठाई तुझ्याच
राहावे संग संग ।
गावे सदा तुझेची
गोड तुझे अभंग ।
स्मरण तुझेची होता
मीही व्हावे पांडुरंग ।
विठ्ठल विठ्ठल जपावे
नामात व्हावे दंग ।
Sanjay R.

नाही मनाला ठाव

नाही मनाला ठाव
घेईल कुठे ते धाव ।
बघताच वाटे हवे
असते सदाच हाव ।
विचारेल कोण कोणा
काय रे तुझे नाव ।
ठेवील आपला ठसा
मग खाईल किती भाव ।
सांगा जरा कोण तो
आहे आपलाच राव ।
जातो उधळून सारे
सोसतो गहिरा तो घाव ।
नका सांगू काही आता
मोडला त्याचा डाव ।
फिरवा धरून त्याला
कुठवर त्याची धाव ।
सर्यास सांगतो आता
चोर मी झालो साव ।
Sanjay R.


अंतराचे धडधडणे

गाऊ कसे कळेना
माझे जीवन गाणे ।
वाटेवर क्षणो क्षणी
विचारांचे देणे घेणे ।

कधी ओलवतात कडा
कधी डोळ्यांचे वाहणे ।
गालात फुलते हास्य
आगळे जीवनाचे तराणे ।

आठवणीत काय किती
आतच हृदयाचे रडणे ।
आशेने बघतो जेव्हा
ऐकतो अंतराचे धडधडणे ।
Sanjay R.






लपला सूर्य कुठे

लपला सूर्य कुठे
वर आभाळ दिसते ।
सर सर येतो पाऊस
ऊन मात्र नसते ।

जिकडे तिकडे पाणी
भर भरून वाहते ।
जगणे झाले कठीण
नदीच झाले रस्ते ।
Sanjay R.