भक्तीत तुझ्या रे मी
आहे असा दंग ।
गेलो मिळून अवघा
झालो एक रंग ।
वाटे ठाई तुझ्याच
राहावे संग संग ।
गावे सदा तुझेची
गोड तुझे अभंग ।
स्मरण तुझेची होता
मीही व्हावे पांडुरंग ।
विठ्ठल विठ्ठल जपावे
नामात व्हावे दंग ।
Sanjay R.
लपला सूर्य कुठे
वर आभाळ दिसते ।
सर सर येतो पाऊस
ऊन मात्र नसते ।
जिकडे तिकडे पाणी
भर भरून वाहते ।
जगणे झाले कठीण
नदीच झाले रस्ते ।
Sanjay R.