विसरेल मी कसा
मनात तू माझ्या ।
आठवणीत विसरतो
मलाच मी तुझ्या ।
मनात भाव तोच
होईल कसा दुजा ।
नाहीस तू ही तर
माझी मलाच सजा ।
Sanjay R.
काय तुझ्या मनात
कसा हा समज ।
अबोला वाटे मज
तुझाच गैर समज ।
कळेना तुझे विचार
बंद झाले दार ।
झेलु कसा मी भार
होता तुझाच आधार ।
बघतो दूर आकाशात
मनास वाटते चिंता ।
शोधतो उत्तर प्रश्नाचे
सुटेल कसा हा गुंता ।
Sanjay R.
चिमणीचे घर मेणाचे
कावळ्याचे घर शेणाचे ।
एकदा पाऊस आला धावून
कावळ्याचे घर गेले वाहून ।
स्वप्न होते आमच्या बाळूचे
घर बांधायचे मग वाळूचे ।
येऊ दे पाऊस कितीही
हातपाय त्याचेच बांधायचे ।
गडबड केली पावसाने तर
सूर्याला जाऊन सांगायचे ।
बांधले घर मग बाळूने
मजला चढला वाळूने ।
पावसात गेले घर वाहून
सूर्याला सांगायचे गेले राहून ।
Sanjay R.