Tuesday, July 26, 2022
हवी तुझी साद
गैर समज
काय तुझ्या मनात
कसा हा समज ।
अबोला वाटे मज
तुझाच गैर समज ।
कळेना तुझे विचार
बंद झाले दार ।
झेलु कसा मी भार
होता तुझाच आधार ।
बघतो दूर आकाशात
मनास वाटते चिंता ।
शोधतो उत्तर प्रश्नाचे
सुटेल कसा हा गुंता ।
Sanjay R.
Monday, July 25, 2022
वाळूचे घर
चिमणीचे घर मेणाचे
कावळ्याचे घर शेणाचे ।
एकदा पाऊस आला धावून
कावळ्याचे घर गेले वाहून ।
स्वप्न होते आमच्या बाळूचे
घर बांधायचे मग वाळूचे ।
येऊ दे पाऊस कितीही
हातपाय त्याचेच बांधायचे ।
गडबड केली पावसाने तर
सूर्याला जाऊन सांगायचे ।
बांधले घर मग बाळूने
मजला चढला वाळूने ।
पावसात गेले घर वाहून
सूर्याला सांगायचे गेले राहून ।
Sanjay R.
छंद लागला
छंद लागला मज
वेड म्हणू का त्याला ।
मोबाईल हातात सदा
जसा तो इश्कचा प्याला ।
चढते नशा मज त्याची
सांगू मी कुणाला ।
आनंदाला येते भरती
रिझवतो मीच मनाला ।
देहभान हरपून सारे
विसरतो मी जगाला ।
छंद हा सुटता सुटेना
तळमळ होते क्षणाला ।
Sanjay R.