Friday, July 22, 2022

वाट

वाट कुठे ही साधी सरळ
काटे कुटे त्यात किती ।
मनात भरते धडकी
मग वाटते सारखी भीती ।
मनात सारखी चिंता
वाटे कशास मारली मती ।
थांबतात अचानकच श्वास
कधी थांबते हृदयाची गती ।
वाट जरी ही वाटे प्रेमाची
कठीण आहे ही अती ।
जपून चाला या वाटेवर
जायचे असेल जर सती ।
Sanjay R.


डोळ्यांची भाषा

डोळ्यांची भाषा सांगा
कुणास कळेना ।
भाव मनातले होतात व्यक्त
वाटते बघावे परत पण
मानच हो वळेना  ।
Sanjay R.


Thursday, July 7, 2022

सात जन्माची जोडी

तुझी माझी आता ही
सात जन्माची जोडी ।
सुख दुःख घेऊ वाटून
त्यातच आहे गोडी ।
दूरचा आहे हा प्रवास
सागरात निघाली होडी ।
कुठे किनारा सागराचा
नेऊन लाट तिथे सोडी ।
Sanjay R.


तिथेच जुळते जोडी

नशिबाचा खेळ सारा
तिथेच जुळते जोडी ।
आयुष्यभर पुरते मग
अवीट संसारात गोडी ।
Sanjay R.


रिमझिम पाऊस

सांग असा कसा रे
तू पाऊस ।
कुठे पडतो नि......
कुठे पडत नाहीस ।

रिमझिम तू पडतो
वाटते किती हाऊस ।
झड लावतो जेव्हा
अंत नको रे तू पाहुस ।

वाट पाहतात सारे
तुझ्या येण्या अन जाण्याची ।
उमगते मग आम्हा
गरज किती रे पाण्याची ।

थेंब येतो जेव्हा डोळ्यात
हुंदका दाटतो गळ्यात ।
थेंब थेंब भिजून माती
अंकुर फुटतो मळ्यात ।
Sanjay Ronghe