Thursday, July 7, 2022

तिथेच जुळते जोडी

नशिबाचा खेळ सारा
तिथेच जुळते जोडी ।
आयुष्यभर पुरते मग
अवीट संसारात गोडी ।
Sanjay R.


रिमझिम पाऊस

सांग असा कसा रे
तू पाऊस ।
कुठे पडतो नि......
कुठे पडत नाहीस ।

रिमझिम तू पडतो
वाटते किती हाऊस ।
झड लावतो जेव्हा
अंत नको रे तू पाहुस ।

वाट पाहतात सारे
तुझ्या येण्या अन जाण्याची ।
उमगते मग आम्हा
गरज किती रे पाण्याची ।

थेंब येतो जेव्हा डोळ्यात
हुंदका दाटतो गळ्यात ।
थेंब थेंब भिजून माती
अंकुर फुटतो मळ्यात ।
Sanjay Ronghe


Wednesday, July 6, 2022

मुक्ती आता हवी

थकलो कंटाळलो
मुक्ती आता हवी ।
जाऊ कुठे मी आता
हवी वाट एक नवी ।
रोजच असते सकाळ
पूर्वेला उगवतो रवी ।
रात्र असते काळी
बंधनात तू अवि ।
Sanjay R.

कुठे मुक्ती

बंधनातून या कुठे मुक्ती
निष्फळ होतील साऱ्या युक्ती ।

जीवनाचे तर रंग अनेक
नाही बंधन नाही सक्ती ।

मनात आहे एकच भाव
करतो मी तुझीच भक्ती ।

विश्वास माझा ढळला नाही
हवी मजला तुझीच शक्ती ।
Sanjay R.


हवे एक बंधन

नको आता मुक्ती
हवे एक बंधन ।
परत एकदा बघा
करा जरा मंथन ।

विचारांना नाही
कुणाचा लगाम ।
वागणूक झाली
किती ही बेफाम ।

नाही कुणाचा मान
विसरलो सन्मान ।
मिरवतात सारेच
स्वतःचा अभिमान ।
Sanjay R.