थकलो कंटाळलो
मुक्ती आता हवी ।
जाऊ कुठे मी आता
हवी वाट एक नवी ।
रोजच असते सकाळ
पूर्वेला उगवतो रवी ।
रात्र असते काळी
बंधनात तू अवि ।
Sanjay R.
बंधनातून या कुठे मुक्ती
निष्फळ होतील साऱ्या युक्ती ।
जीवनाचे तर रंग अनेक
नाही बंधन नाही सक्ती ।
मनात आहे एकच भाव
करतो मी तुझीच भक्ती ।
विश्वास माझा ढळला नाही
हवी मजला तुझीच शक्ती ।
Sanjay R.
नको आता मुक्ती
हवे एक बंधन ।
परत एकदा बघा
करा जरा मंथन ।
विचारांना नाही
कुणाचा लगाम ।
वागणूक झाली
किती ही बेफाम ।
नाही कुणाचा मान
विसरलो सन्मान ।
मिरवतात सारेच
स्वतःचा अभिमान ।
Sanjay R.
नको दूर जाऊ
स्वप्न एक पाहू ।
अंतर मनातले
नको त्याचा बाऊ ।
धरून हात आता
सोबत थोडं धावू ।
जीवाला जीव हा
एना थोडा लावू ।
Sanjay R.