Wednesday, July 6, 2022

हवे एक बंधन

नको आता मुक्ती
हवे एक बंधन ।
परत एकदा बघा
करा जरा मंथन ।

विचारांना नाही
कुणाचा लगाम ।
वागणूक झाली
किती ही बेफाम ।

नाही कुणाचा मान
विसरलो सन्मान ।
मिरवतात सारेच
स्वतःचा अभिमान ।
Sanjay R.


Tuesday, July 5, 2022

तांडव

करतात तांडव या लाटा
परततात आपल्या वाटा ।

असे कसे हे वादळ उठले
सोबत पाऊस वारे सुटले ।

नदी नाले ही बेफाम झाले
बुडऊन अंगण पाणी आले ।

जिकडे तिकडे पाणी पाणी
सांग पावसा तुझी कहाणी ।

होते नव्हते सारेच बुडले ।
घर कुठे ते छप्पर उडले ।

थाम्ब थाम्ब रे तू पावसा ।
रात्र झाली बघतो दिवसा ।

सूर्य कुठे तो कसा दिसेना 
भरले आभाळ  चूप बसेना ।
Sanjay R.

अंतर मनातले

नको दूर जाऊ
स्वप्न एक पाहू ।
अंतर मनातले
नको त्याचा बाऊ ।
धरून हात आता
सोबत थोडं धावू ।
जीवाला जीव हा
एना थोडा लावू ।
Sanjay R.


षडयंत्र

विनाशाचे एकच तंत्र
चाले सगळे षडयंत्र ।
खेळ बिघडवतो कोणी
कानात फुंकतो मंत्र ।
बघे बघतात सारे
सोडते प्राण ते यंत्र ।
Sanjay R.


Monday, July 4, 2022

अंतर मनातले

नको दूर जाऊ
स्वप्न एक पाहू ।
अंतर मनातले
नको त्याचा बाऊ ।
धरून हात आता
सोबत थोडं धावू ।
जीवाला जीव हा
एना थोडा लावू ।
Sanjay R.