Sunday, July 3, 2022

मैत्री

मित्र तर मित्रच असतो
कधी का तो शत्रू होतो ।

जीवाला लावतो जीव
प्राणास तो प्राणही देतो  ।

सुख दुःखात असते साथ
संकट सारे डोक्यावर घेतो ।

मैत्रीला आहेच कुठे पर्याय
मैत्रीचा वसा अंतावरी नेतो ।
Sanjay R.


राधे राधे

कोण मित्र कोण शत्रू
ओळखणे नाही साधे ।
ओळख कशीच पटेना
येईल कोण  असे मधे ।
राहून कुठे हो चालते
एकदमच असे साधे ।
जातो टोपी देऊन कोणी
म्हणतो मग राधे राधे ।
Sanjay R.


Saturday, July 2, 2022

आघात

तुझ्या कवितेतली साद
करून गेली आघात ।

शोधतो अर्थ मी शब्दांचा
वाटत जीवन झाले अनाथ ।

जरा दोन पाऊले तू ये पुढे
असेल तूला या मनाची साथ ।

चुकलेली वाट ती मागे गेली
सुटणार नाही धरलेला हात ।
Sanjay R.


ढगांनी वेढलं आकाश

ढगांनी वेढलं आकाश
दर्शन सूर्याचे होईना ।
पडेल केव्हा पाऊस
काय तेच कळेना ।

कधी तरी येतात मधेच 
चार दोन सरी बरसतात ।
भिजत नाही धरा त्यात
रंग पावसाचे ओसरतात ।

शेत अजूनही तहानलेले
पदर धरेचा भिजेना ।
डोळे लागले आकाशात
बी मातीतले रुजेना ।
Sanjay R.

होऊ नको तू माणूस

होऊ नको तू माणूस
भाव मनात तू आणुस ।
मन तुला का कळेना
तेही नको तू जाणूस ।
नाही विचार रे तुझ्यात
नको डोक्याला तू ताणुस ।
होऊ नको तु माणूस
भाव मनात तू आणुस ।
Sanjay R.