बालपणीच्या कथेतली
सुंदर एक परी होती ।
राजकुमार बघतो वाट
दोघांचीही होती प्रीती ।
असे जेव्हा सोबत परी
आनंदी तो व्हायचा किती ।
शत्रू राजा बघून सारे
दाखवायचा त्याला भीती ।
राजकुमार दुःखी होई
नसे त्याच्या काहीच हाती ।
परीनेच मग मार्ग काढला
दोघांचीही जुळली नाती ।
राजकुमार झाला राजा
परी आता राणी होती ।
Sanjay R.
Saturday, July 2, 2022
सुंदर एक परी होती
घे उंच भरारी
थांबू नकोस कुठे
घे उंच तू भरारी ।
आकाश हे विशाल
निर्धार तुझा करारी ।
जग हे मिथ्या सारे
आहे किती विषारी ।
स्वार्थी सारेच इथे
म्हणे मीच अधिकारी ।
भीती सोडून आता
तू उंच घे भरारी ।
Sanjay R.
भय अंधाराचे
भय अंधाराला कुणाचे
प्रकाशाशी वैर त्याचे ।
चंद्र चांदण्या आकाशात
नाते जुळते काळोखाचे ।
रातकिड्यांचा होतो नाद
चमचमणे त्या काजव्याचे ।
सळसळ करती झाडे झुडपे
वाटे वादळ जणू ते शांततेचे ।
Sanjay R.
Friday, July 1, 2022
आहेस तू परी
कुकुली छोटुली
आहेस तू परी
गोड किती हसते
लाडू बाई बरी ।
आईची छकुली
असली जरी ।
बाबांची लाडकी
आहेस खरी ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)