Saturday, July 2, 2022

पाऊस

आकाशात दिसतात ढग
पण पडत नाही पाऊस ।
वावर पाहते वाट आता
वेळ नको रे तू लाऊस ।
Sanjay R.


भय अंधाराचे

भय अंधाराला कुणाचे
प्रकाशाशी वैर त्याचे ।
चंद्र चांदण्या आकाशात
नाते जुळते काळोखाचे ।
रातकिड्यांचा होतो नाद
चमचमणे त्या काजव्याचे ।
सळसळ करती झाडे झुडपे
वाटे वादळ जणू ते शांततेचे ।
Sanjay R.

Friday, July 1, 2022

आहेस तू परी

कुकुली छोटुली
आहेस तू परी
गोड किती हसते
लाडू बाई बरी ।
आईची छकुली
असली जरी ।
बाबांची लाडकी
आहेस खरी ।
Sanjay R.


दुःख विना सुख कुठे

दुःखा विना सुख कुठे
सुख दुःखात काय मोठे ।
आयुष्याच्या वाटेवरती
काही खरे काही खोटे ।

दुःख देई मार्ग नवा
सुख तर मागे लोटे ।
दुःख असे क्षणिक सारे
शोधा जरा सुख कोठे ।
Sanjay R.


क्षणभर सुख

क्षणभर सुख कशात
मिळता हवे जे मनात ।
होता कार्याची सुरुवात
थोडी कष्टाची हवी साथ ।
सिद्धीस जाते सारेची
फळ लाभते हातात ।
जेव्हा आशा असे मनात
परिणाम कुठे दुःखात ।
सुख मिळते आनंदात
मिळेल कसे क्षणात ।
Sanjay R.