Thursday, June 30, 2022

मार शक्तीचा

निर्णयच तो असतो
होतो कधी चुकीचा ।
भोगतो मग मात्र
त्रास मात्र दुनियेचा ।
धडपडत असतो सारखा
मार्ग शोधतो मुक्तीचा ।
भोग लागतात भोगावे
फायदा नाही युक्तीचा ।
हळू हळू होतो सराव
मार्ग विसरतो भक्तीचा ।
कधीतरी येते याद
आठवतो मार शक्तीचा ।
Sanjay R.

विचार नको कशाचा

असू दे निर्णय चुकीचा
आता विचार नको कशाचा ।
येऊ दे संकट कितीही
मार्ग तर निघेलच यशाचा ।
हसायचे मस्त जगायचे
भरवसाच कुठे आयुष्याचा ।
कुणासाठी कोण थांबतो
मन्त्र एकच हा जगण्याचा ।
Sanjay R.

Wednesday, June 29, 2022

रात्र


कशावर मी सांगू हक्क
काहीच इथे उरले नाही ।
अंधार दिसतो काळा
सूर्याचा तर पत्ताच नाही ।
चांदण्याही लुप्त झाल्या
चंद्र तर उगवतच नाही ।
मिणमिणते ते काजवे
का ते रात्री जागत नाही ।
Sanjay R.


चालेना आता माथा

सरले दिवस आता
करू काय जाता जाता ।
बसु द्या ना थोडे तरी
सांगतो मी माझी कथा ।
गाठीला आहेत बांधलेले
त्यात साऱ्याच व्यथा ।
प्रश्न आहे पुढ्यात
चालेना आता माथा ।
Sanjay R.


आनंदाची प्रभात

अंतरातल्या विचारांना
शब्दांची हवी साथ ।
अवतरते मग कविता
घेऊन शब्दांचा हात ।
भावार्थ त्या रचनेचा
दिसे काय या मनात ।
आनंदाची अनुभुती
ती आनंदाची प्रभात ।
Sanjay R.