फुलांचा रंग आणि काट्यांचा संग
गुलाबालाच जमतो ।
मोगरा बिचारा देऊन सुगन्ध
स्वतःच दमतो ।
बाकी फुलांची व्यथाच वेगळी
कोण कुणात कसा रमतो ।
गळ्यातला होऊनही हार तुरा
तोही शेवटी जागीच सरतो ।
Sanjay R.
Friday, June 24, 2022
गुलाब मोगरा
कसा रे तू माणसा
कसा रे तू माणसा
करशील किती लोभ ।
नको वागू असा
दिसेल तुलाही क्षोभ ।
जोर ज्याच्या हाती
दाखवितो तो रोब ।
साधा सरळ कुठे चाले
म्हणतात त्याला डूब ।
Sanjay R.
फुल जिथे तिथे काटे
फुल जिथे तिथे काटे
सुखाला का दुःख वाटे ।
वाट प्रेमाची ही कठीण
वाटे सारे जग हे खोटे ।
होई अंतराला यातना
आसवे डोळ्यात दाटे ।
आशा तरीही सुटेना
हवे क्षण आनंदाचे छोटे ।
Thursday, June 23, 2022
मुखवटा मायानगरीचा
कशी ही मायानगरी
सारे जीवन किती वेगळे ।
चेहऱ्यावर लावून मुखवटा
करतात अभिनय सगळे ।
श्रीमंतीचा चढवून साज
कोणी होतो इथला हिरो ।
दारिद्र्याची ओढून चादर
दाखवितो किती तो झिरो ।
प्रेमाचा पडतो कधी पाऊस
कधी द्वेषाची जळते आग ।
कधी आसवे लपवून हसतात
सारेच इथले आहेत महाभाग ।
Sanjay R.
Wednesday, June 22, 2022
घेऊ नको तू विसावा
येरे येरे तू पावसा
केलास किती उशीर ।
वाट होतो पाहात
केलेस किती अधीर ।
पड आता आरामात
घेऊ नको तू विसावा ।
सगळे लागलेत कामाला
सोडू नकोस ओलावा ।
खूप तापला रे सूर्य यंदा
कर म्हणा थोडा आराम ।
बोलव ढगांना मदतीला
घेऊ नकोस तू विराम ।
शेत होऊ दे हिरवे छान
डोलतील सारी पिकं ।
बळीराजा होईल खुश
संपेल घरातलं धुकं ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)