कसा रे तू माणसा
करशील किती लोभ ।
नको वागू असा
दिसेल तुलाही क्षोभ ।
जोर ज्याच्या हाती
दाखवितो तो रोब ।
साधा सरळ कुठे चाले
म्हणतात त्याला डूब ।
Sanjay R.
Friday, June 24, 2022
कसा रे तू माणसा
फुल जिथे तिथे काटे
फुल जिथे तिथे काटे
सुखाला का दुःख वाटे ।
वाट प्रेमाची ही कठीण
वाटे सारे जग हे खोटे ।
होई अंतराला यातना
आसवे डोळ्यात दाटे ।
आशा तरीही सुटेना
हवे क्षण आनंदाचे छोटे ।
Thursday, June 23, 2022
मुखवटा मायानगरीचा
Wednesday, June 22, 2022
घेऊ नको तू विसावा
येरे येरे तू पावसा
केलास किती उशीर ।
वाट होतो पाहात
केलेस किती अधीर ।
पड आता आरामात
घेऊ नको तू विसावा ।
सगळे लागलेत कामाला
सोडू नकोस ओलावा ।
खूप तापला रे सूर्य यंदा
कर म्हणा थोडा आराम ।
बोलव ढगांना मदतीला
घेऊ नकोस तू विराम ।
शेत होऊ दे हिरवे छान
डोलतील सारी पिकं ।
बळीराजा होईल खुश
संपेल घरातलं धुकं ।
Sanjay R.
वेडा गणपा
गणपा आमचा लय भारी
सिनेमा साठी करायचा चोरी
पहिला दिवस पहिला शो
शाळेला मग बुट्टी मारी ।
पिक्चरचा नेहमी ध्यास त्याला
हिरो बनून मारायचा फेरी ।
स्टाईल शिवाय जमायचे नाही
म्हणायचा नेहमी ओ तेरी ।
देखना एकदिन तुम भी सारे
आयेगी एक दिन पिक्चर मेरी ।
बघतोय आता सारेच आम्ही
गणपा फिरतो दारो दारी ।
Sanjay R.