Thursday, June 23, 2022
मुखवटा मायानगरीचा
Wednesday, June 22, 2022
घेऊ नको तू विसावा
येरे येरे तू पावसा
केलास किती उशीर ।
वाट होतो पाहात
केलेस किती अधीर ।
पड आता आरामात
घेऊ नको तू विसावा ।
सगळे लागलेत कामाला
सोडू नकोस ओलावा ।
खूप तापला रे सूर्य यंदा
कर म्हणा थोडा आराम ।
बोलव ढगांना मदतीला
घेऊ नकोस तू विराम ।
शेत होऊ दे हिरवे छान
डोलतील सारी पिकं ।
बळीराजा होईल खुश
संपेल घरातलं धुकं ।
Sanjay R.
वेडा गणपा
गणपा आमचा लय भारी
सिनेमा साठी करायचा चोरी
पहिला दिवस पहिला शो
शाळेला मग बुट्टी मारी ।
पिक्चरचा नेहमी ध्यास त्याला
हिरो बनून मारायचा फेरी ।
स्टाईल शिवाय जमायचे नाही
म्हणायचा नेहमी ओ तेरी ।
देखना एकदिन तुम भी सारे
आयेगी एक दिन पिक्चर मेरी ।
बघतोय आता सारेच आम्ही
गणपा फिरतो दारो दारी ।
Sanjay R.
रात्र परतून आली
सरला दिवस आता
रात्र परतून आली ।
चमचम करते चांदणी
राणी चंद्राची झाली ।
अंधार काळा त्यात मी
शोधतो सूर्याची सावली ।
चन्द्र बघतो दुरून सारे
हास्य चांदणीच्या गाली ।
Sanjay R.