Wednesday, June 22, 2022

रात्र परतून आली

सरला दिवस आता
रात्र परतून आली ।

चमचम करते चांदणी
राणी चंद्राची झाली ।

अंधार काळा त्यात मी
शोधतो सूर्याची सावली ।

चन्द्र बघतो दुरून सारे
हास्य चांदणीच्या गाली ।
Sanjay R.


Tuesday, June 21, 2022

बंध प्रेमाचा अतूट

बदल विचार थोडे
करू नको राजकारण ।
असह्य झाला अबोला
का केलास तू धारण ।
कान झालेत अधीर
सांगुन टाक तू कारण ।
आठवतात शब्द तुझे
ठेवलेत तेच मी तारण ।
बांध प्रेमाचा अतूट
करू नकोस तू हरण ।
Sanjay R.

राजकारण

साधा सरळ मी असा
कुठे जमते राजकारण ।

वेडे वाकडे मार्ग इथले
होतो मनस्ताप विनाकारण ।

हाजी हाजी इथे करायची
दहा वेळा पकडा चरण ।

साध्या सुध्यास कोण जुमनतो
त्याचे फक्त होते मरण ।
Sanjay R.


राजकारण झाले भारी

राजकारण झाले भारी
निघाली कुठे ही वारी ।
मतभेद होती जेव्हा
पडते मधातच दरी ।
होताच अंदाज पावसाचा
काही पोचतात घरी ।
चिंब भिजताना काही
अंगावर घेऊनिया सरी ।
राजकारणाची धुरा कठीण
नाही अशी अवस्था बरी ।
Sanjay R.

Monday, June 20, 2022

निसर्गाची किमया

निसर्गाची किमया बघा
हिरव्या झाडाला लाल फुल ।
आकाशात दिसतात तारे
कुठून येतात वाहणारे वारे ।
आकाशातून पडतो पाऊस
कांपुटरला असतो माउस ।
माणसांची इथे किती गर्दी
पैसे लागतात करायला खरेदी ।
कुतूहलाचे सारेच विषय
कधीच कळेना कशाचा आशय ।
Sanjay R.