Tuesday, June 14, 2022

गावाचे रहस्य

सगळेच जिथे रहस्य
तेच ते आहे गाव ।
असू द्या ना काहीही
त्या छोटया गावाचे नाव ।

झुळ झुळ वाहते नदी
निसर्ग घेतो मन मोहून ।
आंबा चिंच गोड आंबट
तोडावी वाटते धावून ।

मूठभर  दाणे पेरायचे
पोते भरून आणायचे ।
काय किमया होते बघा
रहस्य तिथल्या मातीचे ।

माणसंही साधी भोळी
लळा लावून जातात ।
गरीब असला तरी हो
श्रीमंती त्यांच्या प्रेमात ।

अशी कित्येक रहस्य
दडलीत त्या गावात ।
एकदा फक्त जाऊन बघा
कळेल सारे एका डावात ।
Sanjay R.


Monday, June 13, 2022

मित

कळले मज सारे
कशात माझे हित ।
वागणे तुझे बघ
आहे कशी ही रीत ।
हरणार सांग कशी
होईल तुझी जित ।
माझी तू मी तुझा
ही आपली मित ।
बहरू दे आता
तुझी माझी प्रीत ।
Sanjay R.


दरवळतो सुगंध

तुझा आणि माझा
एक अनामिक संबंध ।
आठवणीनेही मीही
होतो कसा बेधुंद ।
आभास मनाला
दरवळतो सुगंध ।
करतो स्मरण किती
लागला तोच छंद ।
Sanjay R.


अनामिक संबंध

नाव न ज्याचे
गाव न त्याचे ।
सांगू मी नाव
सांगा कुणाचे ।
ओळख ना पाळख
देणे घेणे कशाचे ।
अनामीक तो
संबंध कशाचे ।
Sanjay R.


Sunday, June 12, 2022

आयुष्याचे रंग अनेक

आयुष्याचे रंग अनेक
सुख दुःखाचा त्यात रिटेक ।
गालावर हास्य डोळ्यात अश्रू
वाटते कधी सारेच फेक ।
रंग अनेक ढंग अनेक
मिळतात कधी माणसं नेक ।
Sanjay R.