Saturday, June 11, 2022

करू एक करार

तुझ्या माझ्यात आज
करू एक करार ।
कागदावर नकोच तो
होतो नेहमी फरार ।
मनाचेही खरे नाही
नेहमीच पडते दरार ।
तुझे तू माझे मी
हाच आता विचार ।
दूर झालो दोघे तर
होईल कोण लाचार ।
मी एक सदाचार
तू तर भ्रष्टाचार ।
दुर हो आता तरी
नको मला आधार ।
Sanjay R.


पहिल्या पावसाची झाली बरसात

पहिल्या पावसाची आज
झाली बरसात ।
घेतले चार थेंब मी त्यातून
पसरवून हात ।

गार आकाशातले ते पाणी
थांबेना हातात ।
जो तो होता किती डोलत
झाडही होते हालत ।

माती झाली थोडी ओली
धुंद सारे गंधात ।
गीत पावसाचे होते त्यात
पक्षांचा चिवचिवाट ।

ढोल वाजला आकाशी
ढगांचा गडगडाट ।
मधेच वीज येऊन गेली कशी
तिचाही कडकडाट ।

वाऱ्यालाही होता किती जोर
धावला गारव्यात ।
ढगांनी झाकले सारे आकाश
वाटे झाली ही प्रभात ।
Sanjay R.


करार

विवाह एक करार
नात्यावरती प्रहार ।
प्रेम कुठे उरेल मग
नाही मनाचा विचार ।
नाही कशाचे बंधन
नाही कशाचा आधार  ।
मनमानी जशी चाले
तिथे सारेच लाचार ।
Sanjay R.

Friday, June 10, 2022

पाऊस केव्हा येईन

बघत होतो मी आकाश
ढगांचा नव्हता पत्ता ।
आकाशात चोही कडे
सुर्याचीच होती सत्ता ।

चट चट झोंबायच ऊन
अंगाची व्हायची लाही ।
गळ्याला पडली कोरड
पाण्यासाठी मचली त्राही ।

नदी  नाले पडले कोरडे
विहिरीत नाही उरले काही ।
काळ्या ढगांची वाट आता
भिर भिर सारे आभाळ पाही ।

येऊ दे रे पहिला पाऊस
मीही थोडं भिजून घेईन ।
वादळ झाले वारे झाले
सांगा पाऊस केव्हा येईन ।
Sanjay R.


प्रेमाचे किती प्रकार

प्रेमाचे किती प्रकार
जणू जडलेत विकार ।
नाही त्यास अस्तित्व
नाही कुठला आकार ।
अंतरात चाले सारे
किती किती ते विचार ।
जुळले जर सारेच
तेव्हाच होई साकार ।
नशिबात नसेल तर
मिळेल फक्त नकार ।
Sanjay R.