Saturday, June 11, 2022
करार
Friday, June 10, 2022
पाऊस केव्हा येईन
बघत होतो मी आकाश
ढगांचा नव्हता पत्ता ।
आकाशात चोही कडे
सुर्याचीच होती सत्ता ।
चट चट झोंबायच ऊन
अंगाची व्हायची लाही ।
गळ्याला पडली कोरड
पाण्यासाठी मचली त्राही ।
नदी नाले पडले कोरडे
विहिरीत नाही उरले काही ।
काळ्या ढगांची वाट आता
भिर भिर सारे आभाळ पाही ।
येऊ दे रे पहिला पाऊस
मीही थोडं भिजून घेईन ।
वादळ झाले वारे झाले
सांगा पाऊस केव्हा येईन ।
Sanjay R.
प्रेमाचे किती प्रकार
प्रेमाचे किती प्रकार
जणू जडलेत विकार ।
नाही त्यास अस्तित्व
नाही कुठला आकार ।
अंतरात चाले सारे
किती किती ते विचार ।
जुळले जर सारेच
तेव्हाच होई साकार ।
नशिबात नसेल तर
मिळेल फक्त नकार ।
Sanjay R.
Thursday, June 9, 2022
जबरदस्ती
तुटते जेव्हा गस्ती
चालते मग मस्ती ।
दोन वेगळ्या हस्ती
करतात जबरदस्ती ।
ताणता थोडे जास्ती
असते मनात धास्ती ।
आफत येते नसती
सारे प्लान फसती ।
Sanjay R.
Wednesday, June 8, 2022
मराठीची दैना झाली
शब्दांचा होतो गोंधळ
इंग्रजीचा डंका भारी ।
मराठी बिचारी शांत किती
सोसते ती इंग्रजीची स्वारी ।
इंग्रज जरी गेलेत सोडून
इंग्रजी आमची सुटली नाही ।
मराठीचे ती धरते पाय
सरसावून आपल्या दोन्ही बाही ।
मराठी तर चाकर बिचारी
बॉस तिचा तर इंग्रजी झाला ।
सहन करते अत्याचार सारे
दिवस तिच्या लाचरिचा आला ।
दैना झाली हो या मराठीची
तुटून फुटून आता जगत आहे ।
द्याना तिला आधार थोडा
सगळे तुमच्याच हातात आहे ।
Sanjay R.