Friday, June 10, 2022

प्रेमाचे किती प्रकार

प्रेमाचे किती प्रकार
जणू जडलेत विकार ।
नाही त्यास अस्तित्व
नाही कुठला आकार ।
अंतरात चाले सारे
किती किती ते विचार ।
जुळले जर सारेच
तेव्हाच होई साकार ।
नशिबात नसेल तर
मिळेल फक्त नकार ।
Sanjay R.


Thursday, June 9, 2022

जबरदस्ती

तुटते जेव्हा गस्ती
चालते मग मस्ती ।
दोन वेगळ्या हस्ती
करतात जबरदस्ती ।
ताणता थोडे जास्ती
असते मनात धास्ती ।
आफत येते नसती
सारे प्लान फसती ।
Sanjay R.


Wednesday, June 8, 2022

मराठीची दैना झाली

शब्दांचा होतो गोंधळ
इंग्रजीचा डंका भारी ।
मराठी बिचारी शांत किती
सोसते ती इंग्रजीची स्वारी ।

इंग्रज  जरी गेलेत सोडून
इंग्रजी आमची सुटली नाही ।
मराठीचे ती धरते  पाय
सरसावून आपल्या दोन्ही बाही ।

मराठी तर चाकर बिचारी
बॉस तिचा तर इंग्रजी झाला ।
सहन करते अत्याचार सारे
दिवस तिच्या लाचरिचा आला ।

दैना झाली हो या मराठीची
तुटून फुटून आता जगत आहे ।
द्याना तिला आधार थोडा
सगळे तुमच्याच हातात आहे ।
Sanjay R.


Tuesday, June 7, 2022

प्रवास हसत खेळत

मित्रांनो प्रवास या विषयावर जे काही सुचलं ते तुमच्या बरोबर शेअर करत आहे. नक्की वाचा...

तुमच्या प्रतिक्रिया कळवा.....

आपले आयुष्य हा तर आपल्या जीवनाचा प्रवासच आहे....

या प्रवासात सर्वात प्रथम आपली भेट होते ती आई आणि वडिलांची.....

नंतर भेट होते ती भाऊ बहिणींची......

नंतर भेटतात आजी, आजोबा, काका, मामा आणि इतर नातेवाईक......

मग भेटतात आपल्या आजूबाजूचे, आपल्या संपर्कात येणारे मित्र मैत्रिणी सहयोगी आप्त जेष्ठ , गुरुजन आणि इतर......

हळू हळू दिवस जातात........ वर्ष उलटतात......

प्रवासातले प्रवासी काही कमी कमी होतात, काही नवीन जुळतात.......

मग एक प्रवासी तुमच्या आयुष्यात असा प्रवेश करतो की जो अगोदर तुम्हाला अनोळखी असतो पण त्याचे तुमचे नाते असे जुळते की.... ते तुमच्या श्वासाच्या अंतापर्यंत तुम्हाला साथ देते......

तुमचे सुख, दुःख ती व्यक्ती स्वतःचे समजून त्यावर मात देण्यास तुमच्या बरोबरीने तुमची होऊन जाते......

ती व्यक्ती असते पती किव्वा पत्नी.......

मग हा तुमचा प्रवास असाच सोबतीने पुढे सुरू होतो......

या द्वयी प्रवासात मग आगमन होते ते छोट्या छोट्या बाळांचे .......

ते बाळ तुमचे विश्वच बदलून टाकतात......

मग तुमचा प्रवास एका जवाबरीच्या भूमिकेने सुरू होतो........

हळू हळू हे बाळ मोठे होते.....
मग त्या बाळाचा  स्वतः चा प्रपंच प्रवास सुरु होतो.......

इथे मग उरता तुम्ही फक्त दोघे.......

हा प्रवास थोडा अवघड असतो.......

तुम्ही म्हातारपणात प्रवेश करता.......

तुम्हाला त्या प्रवासात मदतीची फार गरज असते. पण मदतीला असते फक्त तुमची सगळ्यात जवळची व्यक्ती....... तीच ती जी आजवर तुम्हाला निरंतर साथ देत आलेली....... 

तोच तुमचा जन्माचा साथी असतो.......

तोच शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतो.........
येकमेकांच्या सोबतीने हा प्रवास अवघड असूनही मग सहज होऊन जातो.........

एकमेकांना सांभाळून हळू हळू मग एक दिवस हा प्रवास सरतो........

पण जो पर्यंत आपण या जीवनाचे प्रवासी आहोत तो पर्यंत एकमेकांना सांभाळत प्रवासाला पुढे जातो........

म्हणून मित्रांनो या तुमच्या सहप्रवास्याला जपा.......

आनंदात उत्साहात जगा आणि जगू द्या.......

स्वतःही हसा आणि इतरांना हसवा......

संजय रोंघे
नागपूर
मोबाईल - 8380074730


Monday, June 6, 2022

प्रेम जीवनाचा आधार


अथांग किती सागर
नौका होतेच पार ।

जीवन नदीची धार
भरतो तिनेच सागर ।

नाही नदी विना सागर
भरते प्रेमाची घागर ।

जीवनाचा एकच सार
प्रेम जगण्याचा आधार ।
Sanjay R.