Monday, June 6, 2022

प्रेम जीवनाचा आधार


अथांग किती सागर
नौका होतेच पार ।

जीवन नदीची धार
भरतो तिनेच सागर ।

नाही नदी विना सागर
भरते प्रेमाची घागर ।

जीवनाचा एकच सार
प्रेम जगण्याचा आधार ।
Sanjay R.


प्रेम अंतरातला तो कोपरा

प्रेम तर  हे स्वच्छंद
जीवनाचा तो आनंद ।
अंतरातला तो कोपरा
नाही कुठला छंद ।
लुकलूकणारा तारा तो
किरण प्रकाशाचे मंद ।
नाही कशाची मर्यादा
नाही कुठलेच बंध ।
जस जसे ते फुलते
दरवळतो किती सुगंध ।
उमलतात मग आशा
आणि मन होते बेधुंद ।
Sanjay R.


Sunday, June 5, 2022

जीवन धारा

मार्ग निवडला मी
कुठे न थांबणारा ।
कुठवर जाणार तो
कधीच न कळणारा ।
फक्त वन वे आहे तो
सतत पुढेच जाणारा ।
मागे अंधार काळा
नाही कशाचा इशारा ।
पुढे आशेचा किरण
मागे दुःखाचा पहारा ।
चाललो किती एकटा
नाही कुणाचा सहारा ।
अनंताची ही यात्रा
वाहतो जीवन धारा ।
संपेल जिथे हा रस्ता
होईल मीही एक तारा ।
Sanjay R.





कुठे थांबतो रस्ता

कुठे थांबतो रस्ता
पुढे पुढे तो जातो ।
थांबू नका पुढे चला
हवे तिथे तो नेतो ।
मधेच येईल वळण
मार्ग आपला तो घेतो ।
आहे पुढ्यात ते लक्ष
जीव तेथे सुखावतो ।
Sanjay R.


Saturday, June 4, 2022

पाहट ही झाली

उधळून आज रंग
पहाट ही झाली ।

दूर उगवला सूर्य
पसरली त्याची लाली ।

चिवचिव करत सारी
पाखरे कुठे निघाली ।

वाहते हवाही संथ
वाटते गार ओली ।

सुटला गंध मोगऱ्याचा
हवा ही धुंद झाली ।

शोधू कुठे मी मलाच
जाग मलाही आली ।

मिठीत तुझ्या मी होतो
मिठी ही सैल झाली ।

रात्र कशी ती सरली
दिसते तुझ्याही गाली ।
Sanjay R.