Saturday, June 4, 2022

पाहट ही झाली

उधळून आज रंग
पहाट ही झाली ।

दूर उगवला सूर्य
पसरली त्याची लाली ।

चिवचिव करत सारी
पाखरे कुठे निघाली ।

वाहते हवाही संथ
वाटते गार ओली ।

सुटला गंध मोगऱ्याचा
हवा ही धुंद झाली ।

शोधू कुठे मी मलाच
जाग मलाही आली ।

मिठीत तुझ्या मी होतो
मिठी ही सैल झाली ।

रात्र कशी ती सरली
दिसते तुझ्याही गाली ।
Sanjay R.



अप्पू

आमच्या गावात होता एक अप्पू चारी......
ठेंगणा ठुसका होता तो भारी.........

भेदरे नाक, तिरके डोळे......
कपाळ मोठे, दिसायचा कसातरी........

रंग होता काळा..........
रागावला की मग पडायचा निळा.......

नटवरलाल म्हणताच धावायचा मागे........
शिव्या देत देत मग पठीमागेच लागे..........
असा मात्र तो छानच वागे.........

वाटायचा सरळ पण होता तिरका.......
बोलता बोलता  आवज काढायचा चिरका.......

म्हणताच कोणी, आली गावात सर्कस.....
खुश तो व्हायचा.......
स्वतःच स्वतःला हिरो म्हणायचा.....

बघून सर्कस खूप हसायचा......
बनून मग जोकर गावभर फिरायचा ......

गावात एकदा अशीच आली सर्कस....
विदूषक म्हणून अप्पू झाला भरती......

प्रत्येक शो मध्ये अप्पूच दिसायचा.......
पोट धरून धरून लोकांना हसवायचा......

झुल्याच्या शो मध्ये खाली पडायचा....
वाघाच्या समोर नुसताच पळायचा.......

ढिला ढाला पॅन्ट हाताने धरायचा....
खाली जाताच वर करायचा......

रागावलं कोणी तर खूप रडायचा....
लोकांना बघून खूप हसायचा...... 
अप्पू शिवाय मग शो नाही व्हायचा......

अप्पू अप्पू म्हणून आवाज तोच द्यायचा.....
लोकांना बघून टाळ्या वाजवायचा......

मीच आहे हिरो सगळयांना सांगायचा.....
लहान थोरांना ही अप्पूच आवडायचा.....

संपली मग सर्कस हिरमुसला अप्पू .....
म्हणतो स्वतःला मीच का असा ढप्पू ......

एकदा बघा गममतच झाली......
त्याच्याच उंचीची मुलगी मिळाली......

प्रेमात पडला अप्पू......
नाव तिचे टिककु......

अप्पू गेला विचारायला करशील का लग्न.....
ती म्हणे आवडला नाही तू मला.....
बघून मी ठरविल तुझं कसं वागणं.....

अप्पू ने मिळवला तिच्या घराचा पत्ता....
टिककु टिककु करत मारायचा फेऱ्या...

टिककुही मग दाखवायची तोरा....
कमी पडायचा अप्पूच दोरा.....

कंटाळून शेवटी टिककु झाली तयार....
अप्पू टिककुच्या लग्नात आली बहार......

अप्पू टिककु ची जोडी जमली.....
दोघेही मग एकमेकात रमली......

दोघेही आता दुकानात बसतात....
जुन्या आठवणी काढून खूप हसतात....

संजय रोंघे
नागपूर
मोबाईल - 8380074730


जीव जडला तुझ्यात

करून तू चोरी
फिरतोस बनून राव ।
सांग रे लबाडा
कुठवर तुझी धाव ।
सारखा करतोस फेऱ्या
नाही सम्पत का हाव ।
माझ्याशिवाय सांग
तुज देईल कोण रे भाव ।
किती फिरलास मागे
लागला नाही ना ठाव ।
हृदय माझे चोरून तू
होऊ नकोस आता साव ।
मलाही झाली सवय 
बघ दिसेल तुलाही प्रभाव ।
हवी जन्माची साथ
नाही देणार ना रे तू घाव ।
जीव जडला तुझ्यात
जीव जीवाला तू लाव ।
Sanjay R.

चोर

सांग हृदयावर चालतो

का असा कुणाचा जोर ।

नकळतच होते चोरी

फुलतो मग मनात मोर ।

कालचाच तर मी होतो

साधा सरळ एक पोर ।

स्वप्न मनात होते एक

हवी वाटे चंद्राची कोर ।

हृदय माझे चोरलेस तू

पण झालो मीच थोर ।

शोधू कुठे मी आता

माझ्या हृदयाचा चोर ।

Sanjay R.



Friday, June 3, 2022

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
प्रत्येकाचे वेगळे तत्व ।
शोधू कुठे सांगा कसे
त्यातून हवे तेच सत्व ।

आतून एक बाहेर दुसरा
शोधणे कठीण गुण खरा ।
अंतराचा लागेना ठाव
कळते ती वेगळीच तऱ्हा ।

दिसण्यावर नका जाऊ
दिसते तसे ते नसते ।
फसवणूक झाली तर
जग आपल्यालाच हसते ।
Sanjay R.