Friday, June 3, 2022

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
प्रत्येकाचे वेगळे तत्व ।
शोधू कुठे सांगा कसे
त्यातून हवे तेच सत्व ।

आतून एक बाहेर दुसरा
शोधणे कठीण गुण खरा ।
अंतराचा लागेना ठाव
कळते ती वेगळीच तऱ्हा ।

दिसण्यावर नका जाऊ
दिसते तसे ते नसते ।
फसवणूक झाली तर
जग आपल्यालाच हसते ।
Sanjay R.


Thursday, June 2, 2022

जीवनाचे काय झाले

काय काय घडून गेले
सारेच तर उडून गेले ।
जुना भूतकाळ झाला
सजमजून आता आले
वर्तमानात जगता जगता
विचार भविष्याचे आले ।
काय करू काय नको
दिवासा मागे दिवस गेले ।
अजूनही मी तिथेच उभा
बघा जीवनाचे काय झाले ।
Sanjay R.


Wednesday, June 1, 2022

अपूर्ण स्वप्न

स्वप्नांची तर एकच व्यथा
अपूर्णच असते ती कथा ।

जेव्हा जेव्हा मी बघतो स्वप्न
घडते उलटे नशीबाचाच ताता

मनात होते स्वप्नांचीच गाथा
सरते आयुष्य पाहता पाहता ।

अंत समयी मग कळते सारे
होतो माझा मीच विधाता ।
Sanjay R.


Tuesday, May 31, 2022

चेतवू नको ही वाणी

चेतवू नको ही वाणी

दुःखाची आहे कहाणी ।

पडेल अपुरे विझविण्या
टाकशील कितीही पाणी ।

बघ डोळ्यात जरा दिसेल
आटलेल्या अश्रूंची निशाणी ।

मुखावर आहे खोटेच हास्य
अंतरात आहेत गाऱ्हाणी ।
Sanjay R.



आघात

थाम्ब जरा तू नको जाऊ
करू किती मी विनवणी ।

बघ वळून जरा काय मागे
दिसेल जुनीच ती निशाणी ।

हृदयात ठेवली जपून मी
तुझी माझी ती गोड कहाणी ।

घट्ट हृदयात अजूनही रुतलेली
सांग काढू कशी निशाणी ।

येतो आठवणींचा पूर जेव्हा
थांबेचना डोळ्यातले पाणी ।

नको करुस मनावर आघात
सांगून तू गेलीस की चेतावणी ।
Sanjay R.