Wednesday, April 27, 2022

विठ्ठला

हात गुंतले कामात
मुख हे हरी नामात ।
डोळे शोधती विठ्ठल
आस दर्शनाची मनात ।
दूर इतका तू पंढरी
जावे वाटे मज क्षणात ।
धारूनिया पाय तुझे रे
अर्पावी आसवे चरणात ।
आठवण येण्यास सदा
ठेव मजसी तू दुःखात ।
Sanjay R.

Tuesday, April 26, 2022

मनाचा संघर्ष

विचारांचा गुंता सारा
नजरेत होता आदर्श ।
तयारच नव्हते मन
अंतरात चालला संघर्ष ।
सुख बघितले कुणाचे
झळकला मुखावर हर्ष ।
दुःखाच्या वाटे वरती
जाणवेना कुठला स्पर्श ।
थिजली नजर डोळ्यात
काळोखात कुठे दर्श ।
जगतो जीवन कसा मी
लोटतो एक पुढे वर्ष ।
Sanjay R.

शहर कुठले माझे

पोटासाठी फिरतो वणवण
शहर कुठले हो माझे ।
गरिबांचा संसार असाच
वाहतो जगण्यासाठी ओझे ।
वर बघतो आकाशात
वाटते किती ते खुजे ।
दिवसही मोजत नाही
घडतात आपोआप रोजे ।
Sanjay R.

Wednesday, April 20, 2022

सलाह

दे ना तू #सलाह मुझको
मै भी हू समझदार थोडा ।
चलते चलते गीर न जाऊं
काहे बनता है तू रोडा ।
Sanjay R.


Saturday, April 9, 2022

मराठी कथा आणि काव्य संग्रह

आता माझा कथा आणि काव्य संग्रह फ्लिप कार्ट वर उपलब्ध आहेत, नक्की वाचा....