Friday, February 25, 2022

इंद्रधनुष्य

सारखे बदलतात रंग
वाटे जणू इंद्र धनुष्य ।
सुख दुःखाच्या वाटेवर
नाही एकटा मी मनुष्य ।
यात्रा चाले ही अविरत
बघतो अनेकानेक दृश्य ।
डोळ्यात जरी आसवे
ठेवितो मुखावर हास्य ।
Sanjay R.

Thursday, February 24, 2022

सावली झाडाची

थकल्या भागल्या शरीराला
सुख देई सावली झाडाची ।
सहज मिटतात मग डोळे
मिठीत घेते झोप ती लाडाची ।
Sanjay R.

Wednesday, February 23, 2022

कल्पना

कल्पनेच्या या जगात
कुठे कशाचे अस्तित्व ।
स्वतःलाच जातो विसरून
जपतो नसलेल्याचे महत्व ।
Sanjay R.

Tuesday, February 22, 2022

सूर्यास्त

दिवसभर चालून थकला
झाला सूर्याचा अस्त ।
आली फौज चांदण्यांची
चमचमण्यात त्या व्यस्त ।
Sanjay R.

Monday, February 21, 2022

तुटता तारा

आकाशात तुटतो तारा
मिळतो कशाचा इशारा ।

सुख असो वा असो दुःख
मिळेना मनास सहारा ।

येता जीवनात वादळ
डोळ्यास फुटतात धारा ।
Sanjay R.