Thursday, February 3, 2022

कुटुंब

कुटुंब मनलं का बा
मले लय येते इचार ।
डोयापुढं दिसते मंग
कर्ता घरातला लाचार ।

राब राब थो राबते
सकाय असो का दुपार ।
आभाया कडं पायते
डोकश्यात ढगायचा संचार ।

पानी पानी होते जीव
निस्ता पन्याचाच इचार ।
डोयात बी दिसते पानी
जवा होते थो लाचार ।

कष्टाचं कुठं होते चीज
जीवनच त्याच बेजार ।
कधी सुदाच होत नाही
त्याचा दरिद्री आजार ।

जवा पाहान तवा त्याच्या
भोवताल कर्जाचा बाजार ।
कोन त्याले जगू देते
गळा पकडते सावकार ।

नशिबाचे भोग सारे
कुटुंब ही होते लाचार ।
जगाचा म्हनते पोशिंदा
पन कोनालेच नाही इचार ।

संजय रोंघे
नागपूर
मोबाईल - 8380074730


Friday, January 28, 2022

नाते

नाते फक्त नसते ओळख
त्याहून असतो बरा काळोख ।

व्यवहार जसा असावा चोख
नात्यात तसेच नसावे टोक ।

राखून बोलणारे असतात फेक
नात्यात नेहमीच असावे नेक ।

मन किती अस्थिर घेते ते झोका 
नात्यात कशास देता हो धोका ।

जुजबी ओळख उलथून फेका 
नात्यात घ्यावा अंतरातून ठेका ।
Sanjay R.

Thursday, January 27, 2022

लुकलुकता एक तारा

बघतो आकाशात
लुकलुकता एक तारा ।
गालातच हसतो
वाटते करतो इशारा ।

हळूच अंगाशी
खेळे सळाळता वारा ।
झुलतो पदर कसा
छेडतो मनाच्या तारा ।

होई आभास जणू
झुळझुळ वाहे झरा ।
सरसर येतात सरी
चिंब भिजते धरा ।
Sanjay R.

Sunday, January 23, 2022

दीप

जलते है #दीप लाखो यहा
फिरभी अंधेरा, रोशनी कहा ।
आओ मिलके #दीप एक जलाये
रोशन हो भारत, हम चाहे वहा ।
Sanjay R.

Saturday, January 22, 2022

माझे प्रकाशित साहित्य

माझे प्रकाशित साहित्य :
 (शॉपीजन प्रकाशन )

मनातली व्यथा स्वप्नातली गाथा - काव्य संग्रह
सांग... कोण मी कोण तू - काव्य संग्रह
चंद्रा - कथा संग्रह

नाचे मोर मनात -  ई - काव्य संग्रह
राणी - ई - कथा संग्रह 
काहीच कळेना - ई - काव्य संग्रह
दूर किती किनारा - ई - काव्य संग्रह
आसवांची कहाणी - ई - काव्य संग्रह