आसवांची कहाणी
गाते दुःखाची गाणी ।
मुखावर दिसे हास्य
कळते कुणास वाणी ।
मुकाट्यानेच भोगतो
ऐकतो कोण गाऱ्हाणी ।
हृदयावर होतात घाव
अंतरात त्याची निशाणी ।
विचारांची होते राख
मनास कोण जाणी ।
नशिबाचे भोग सारे
येते डोळ्यात पाणी ।
Sanjay R.
वाट पाहे राधा
वृन्दावनात ।
आहे कुठे कृष्ण
बघा द्वारकेत ।
करी राधा ध्यास
मन मोहनात ।
दिसेना कन्हा कुठे
डोळ्यात बरसात ।
नटली किती राधा
सख्यासाठी खास ।
सख्यविना कशी
होईल रास ।
डोळ्यात आस
सदा होतो भास ।
येनारे तू कान्हा
थांबतील श्वास ।
Sanjay R.
काट्याने निघतो काटा
चालल्याने मिळे वाटा ।
नसेल द्यायचे उत्तर तर
विषयालाच द्यायचा फाटा ।
असेल जर मनात तर
दुकान तिथेच थाटा ।
विचार नका करु हो
नफा हो नाही तर तोटा ।
Sanjay R.
कुणाला काय वाटते
अर्थ काय त्याला
प्रयत्नांना दिसेना दिशा
सांगू मी कुणाला ।
समजवता मीच आता
माझ्याच या मनाला ।
दाखवून द्यायचे एकदा
सम्पूर्ण या जगाला ।
मार्ग हवा जो जाई तिथे
सांगा मुक्ती हवी मला ।
Sanjay R.