Thursday, December 30, 2021

काट्याने निघतो काटा

काट्याने निघतो काटा
चालल्याने मिळे वाटा ।
नसेल द्यायचे उत्तर तर
विषयालाच द्यायचा फाटा ।
असेल जर मनात तर
दुकान तिथेच थाटा ।
विचार नका करु हो
नफा हो नाही तर तोटा ।
Sanjay R.


मुक्ती

कुणाला काय वाटते
अर्थ काय त्याला
प्रयत्नांना दिसेना दिशा
सांगू मी कुणाला ।
समजवता मीच आता
माझ्याच या मनाला ।
दाखवून द्यायचे एकदा
सम्पूर्ण या जगाला ।
मार्ग हवा जो जाई तिथे
सांगा मुक्ती हवी मला ।
Sanjay R.


जमेल म्हणता म्हणता

नेहमीच असतो
प्रश्न एक डोक्यात ।
मन मात्र असते
आपल्याच हेक्यात ।

जमेल म्हणता म्हणता
येतो मीच धोक्यात ।
शिरत नाही काही
रिकाम्या खोक्यात ।

होकार की नकार
दोन्हीही एकात ।
क्षणातच कसे ते
विचारच फिरतात ।
Sanjay R.


कसं जमेल सारं

कसं जमेल सारं
चिंता असते डोक्यात ।
प्रयत्नांची कुठे कमी
अपयशच येते वाट्यात ।
तरी विचार आहे पक्का
जायचे नाही कुठे खोट्यात ।
Sanjay R.


सुखी जीवन

शोधू नका आनंद
अंतरात तो लपलेला ।
कशात मिळतो तो
हवा थोडा शोधायला ।
छंदच असेल तो
सखा तो मन रमायला ।
आनंदा वीणा हवे काय
सुखी जीवन जगायला ।
Sanjay R.