जावे कुठे कळेना
वाट ही अनोळखी ।
वाटतो वारा सोबती
करी तोही दुःखी ।
दिशा मज मिळेना
कसा होईल सुखी ।
पोटास हवा आधार
लागेना काही मुखी ।
नशिबाचा कसा फेरा
काय कुणाची चुकी ।
अंत आला जवळ
शेवटाचीच धुकधुकी ।
Sanjay R.
ओझे मला माझेच
आता झेपत नाही ।
देऊ कसे मी फेकून
तेही करवत नाही ।
करू कसा मी तुझा
उद्वेग तोही होत नाही ।
मनात विचारांचे वादळ
मज आता सुचतच नाही ।
कळू दे मनातले तुझ्या
मगच मन सांगेल काही ।
Sanjay R.
द्वेष करतो हो घात
सर्व सोडीती साथ ।
दूर होती मग सारे
मिळेल कुणाचा हात ।
देताच सोडून द्वेष
होईल सारी मात ।
गोड बोलणे कुणाचे
जीवनात तीच प्रभात ।
Sanjay R.