Thursday, December 23, 2021

कल्पना

ओझे मला माझेच
आता झेपत नाही ।
देऊ कसे मी फेकून
तेही करवत नाही ।
करू कसा मी तुझा
उद्वेग तोही होत नाही ।
मनात विचारांचे वादळ
मज आता सुचतच नाही ।
कळू दे मनातले तुझ्या
मगच मन सांगेल काही ।
Sanjay R.


द्वेष करतो घात

द्वेष करतो हो घात
सर्व सोडीती साथ ।
दूर होती मग सारे
मिळेल कुणाचा हात ।
देताच सोडून द्वेष
होईल सारी मात ।
गोड बोलणे कुणाचे
जीवनात तीच प्रभात ।
Sanjay R.


Monday, December 20, 2021

आभाळ आले भरून

आभाळ आले भरून
थेंब पावसाचे धरून ।
आसवं डोळ्यात जमा
ओघळले गाला वरून ।
संजय रोंघे

साद

साधू कसा मी संवाद
माझा मीच झालो बाद ।

नकळत घडते सारे
होईना कुठला वाद ।

ओठही झाले चूप
ऐकू येईना नाद ।

शून्यात लागली नजर
देईल कोणी मग दाद ।

ध्यास लागला आता
येईल का कुणाची साद ।
Sanjay R.

नकोच हा एकांत

नकोच मज हा एकांत
आहे का हो मी संत ।
साधे सरळ जीवन माझे
नकोच कुठले दृष्टांत ।
सहनशक्ती आहे अपार
होणार आहे एकदा अंत ।
घेतो जगून आहे जोवर
चिंता नको आहे निवांत ।
Sanjay R.