Monday, December 20, 2021

आभाळ आले भरून

आभाळ आले भरून
थेंब पावसाचे धरून ।
आसवं डोळ्यात जमा
ओघळले गाला वरून ।
संजय रोंघे

साद

साधू कसा मी संवाद
माझा मीच झालो बाद ।

नकळत घडते सारे
होईना कुठला वाद ।

ओठही झाले चूप
ऐकू येईना नाद ।

शून्यात लागली नजर
देईल कोणी मग दाद ।

ध्यास लागला आता
येईल का कुणाची साद ।
Sanjay R.

नकोच हा एकांत

नकोच मज हा एकांत
आहे का हो मी संत ।
साधे सरळ जीवन माझे
नकोच कुठले दृष्टांत ।
सहनशक्ती आहे अपार
होणार आहे एकदा अंत ।
घेतो जगून आहे जोवर
चिंता नको आहे निवांत ।
Sanjay R.

Saturday, December 18, 2021

गुंता

सोडवू कसा मी गुंता
गुंतून पडलो मी इथे ।
गुरफटलो कसा तयात
जाऊ कसा मी तिथे ।
वाट ही अवघड किती
शोधू मी काय इथे ।
सरेल का वाट कधी
जायचे मज आहे जिथे ।
Sanjay R.









मुंगी साखरेचा रवा

मुंगी साखरेचा रवा
म्हणे हवा तिला खवा ।
नको जाऊ सांगे सारे
तरी खवाच तिला हवा ।
ऐकेना काहीच कुणाचे
कसा जोम तिचा नवा ।
पडली जेव्हा उलटून
म्हणे मदतीला धावा ।
कोण कुणासाठी येतो
बघ तुझे तूच रे बावा  ।
Sanjay R.