साधू कसा मी संवाद
माझा मीच झालो बाद ।
नकळत घडते सारे
होईना कुठला वाद ।
ओठही झाले चूप
ऐकू येईना नाद ।
शून्यात लागली नजर
देईल कोणी मग दाद ।
ध्यास लागला आता
येईल का कुणाची साद ।
Sanjay R.
मुंगी साखरेचा रवा
म्हणे हवा तिला खवा ।
नको जाऊ सांगे सारे
तरी खवाच तिला हवा ।
ऐकेना काहीच कुणाचे
कसा जोम तिचा नवा ।
पडली जेव्हा उलटून
म्हणे मदतीला धावा ।
कोण कुणासाठी येतो
बघ तुझे तूच रे बावा ।
Sanjay R.
अंगणात फुलला गुलाब
मोगरा दुरून हसतो ।
जास्वन्द मिरवतो डोलात
खुशीत चाफाही दिसतो ।
बहरली कशी रातराणी
गंध तिचा दरवळतो ।
गार गार वाऱ्या सांगे
निशिंगन्धही सळसळतो ।
उघडून डोळे मग बघते
शेवंती पाणाआड़ दडते ।
लाजत मुरडत कशी ती
जाई जुई गालात हसते ।
Sanjay R.