Wednesday, December 15, 2021

करू काय नि काय नको

करू काय नि काय नको
कळत का मलाच नव्हते ।
विचारांचा भार किती 
माझे मलाच मी छळले होते ।
उधळले स्वप्न सारे
संकट का ते टळले होते ।
धूसर झाले सारे आकाश
मनात काय जळले होते ।
डोळ्यापुढे चित्र उभे
काहीच का दिसत नव्हते ।
पडद्या आड काय चाले
मन माझे हसत होते  ।
आरश्यात मी काय बघतो
रूप माझेच दिसत नव्हते ।
Sanjay R.

Tuesday, December 14, 2021

विचारांचे ओझे किती

विचारांचे ओझे किती
लादू मी कुणावर  ।
भार झेलतो मी एकटा
सर्वस्व माझे या मनावर ।

वाटते कधी द्यावे झुगारून
भार होतो डोक्यावर ।
शरीराने तर केली सवय
सांभाळतो मीच अंगावर ।

थांबेल कधी चक्र सारे
बघतो जेव्हा डोक्यावर ।
होईल वाटते मीही कधी
स्वार या साऱ्या गगनावर ।
Sanjay R.


समजते तर सारेच

समजते तर सारेच
उमजून का घेत नाही ।
लक्षणच मेले खोटे 
की मलाच कळत नाही ।
नुसता डोक्याला ताप
काहीच कसे करत नाही ।
डोक्याला झाला भार
मनही बाहेर निघत नाही ।
का गुंतलो मी हा असा
मलाच माझे समजत नाही ।
Sanjay R.

Monday, December 13, 2021

उजाडला दिवस आज

उजाडला दिवस आज
लेऊनिया नवा साज ।
ढग बघतो आकाशातून
धरा म्हणते येते लाज ।
हळूच पसरले ऊन कोवळे
सूर्यानेही चढवला ताज ।
चन्द्र तारे गेले निघूनी
सुंदर किती सृष्टीचा अंदाज ।
Sanjay R.


उमजले मज सारे

उमजले मज सारे
येतात कुठून हे वारे ।
उमजले मज सारे
का चमचमतात तारे ।
ध्यास मनात वेगळा
बहुधा वेडेच सारे ।

घालतो सूर्य प्रदक्षिणा
धरेवरती किती बिचारे ।
पोटात आग भुकेची
फिरतात मारे मारे ।

कुठला मी कोण कसा
स्वप्न कशाचे पाहतो रे ।
असावेच डोळ्यात वसती
ओघळतात तोडून पहारे ।
Sanjay R.