Sunday, December 12, 2021

चला घेऊ संकल्प आता

चला घेऊ संकल्प आता
करू सुरवात नवी आता ।
सरत आले साल जुने
येईल वर्ष नवीन आता ।
जे जे उरले करू आता
घाई नको जाता जाता ।
होतो कमी दिवस एकेक
चाले हिशोब येता जाता ।
मागे वळून नका हो पाहू
सरेल सारे पाहता पाहता ।
Sanjay R.

Saturday, December 11, 2021

आग लागली मनात

आग लागली मनात
रान पेटले  तयात ।
होईल राख सारी
भस्म उरेल अंतरात ।
कोण येईल विझवण्या
धगधगत्या ज्वाळा आत ।
धूर निघेल कुठला
होईल स्वाहा क्षणात ।
अवस्था मनाची काय
धारेवर कधी अनंतात ।
होऊनि एक तारा मीही
राहील दूर आकाशात ।
Sanjay R.








ठिणगीने केला घात

एकाच ठिणगीने केला घात
सखे सोबती गेले सोडून साथ ।

द्वेष कुणाचा नकोच हो मनात
प्रेम माया सरते एकाच क्षणात ।

दुःख येते पाठीशी मग ते सुटेना
थोडा बदल करू या विचारात ।

हसा हसवा रुसा नको रुसवा 
जगू सारेच आपण आनंदात ।
Sanjay R.




Friday, December 10, 2021

वजन किती वाढले

वजन किती वाढले
बघूनच मी ते ताडले ।
खाण्यावर कुठे निबंध
दिसेल त झाडले ।
उरवायचे कशास काही
पोटात सारेच धाडले ।
हळू हळू झाले मोठे
नाही कुणीच छेडले ।
रोजच खाण्याची मौज
इंच इंच कसे जोडले ।
कमी करतोच कुठे
काम सारेच सोडले ।
वजन गेले हो वाढून
कसेच  हे हो घडले
विचारूच नका आता
किती फटाके फोडले ।
Sanjay R.


काय तुझा अबोला

काय तुझा हा अबोला
छळतो एकांत मजला ।
शब्दात तुझ्या काय जादू
सांगू कसे मी तुजला ।
शब्दात तुझ्या मी शोधतो
का माझ्याच मी मनाला ।
आठवून मग शब्द सारे
निजतो ठेऊन उश्याला ।
बघतो स्वप्नात मग सारे
कळते सारेच निषेला ।
पहाटेचा सूर्य बघून कळते
नव्हते कोणीच उषेला ।
Sanjay R.