आग लागली मनात
रान पेटले तयात ।
होईल राख सारी
भस्म उरेल अंतरात ।
कोण येईल विझवण्या
धगधगत्या ज्वाळा आत ।
धूर निघेल कुठला
होईल स्वाहा क्षणात ।
अवस्था मनाची काय
धारेवर कधी अनंतात ।
होऊनि एक तारा मीही
राहील दूर आकाशात ।
Sanjay R.
वजन किती वाढले
बघूनच मी ते ताडले ।
खाण्यावर कुठे निबंध
दिसेल त झाडले ।
उरवायचे कशास काही
पोटात सारेच धाडले ।
हळू हळू झाले मोठे
नाही कुणीच छेडले ।
रोजच खाण्याची मौज
इंच इंच कसे जोडले ।
कमी करतोच कुठे
काम सारेच सोडले ।
वजन गेले हो वाढून
कसेच हे हो घडले
विचारूच नका आता
किती फटाके फोडले ।
Sanjay R.
नको आता वाद
करू या संवाद ।
हाक देताच मी
देशील तू साद ।
ओ ऐकण्या तुझा
करील मी नाद ।
मन होईल शांत
ऐकुनी प्रतिसाद ।
नसेल मग काळजी
मिळे मनास मिजाद ।
तुझी माझी जोडी
घेऊ जीवनाचा स्वाद ।