एकाच ठिणगीने केला घात
सखे सोबती गेले सोडून साथ ।
द्वेष कुणाचा नकोच हो मनात
प्रेम माया सरते एकाच क्षणात ।
दुःख येते पाठीशी मग ते सुटेना
थोडा बदल करू या विचारात ।
हसा हसवा रुसा नको रुसवा
जगू सारेच आपण आनंदात ।
Sanjay R.
वजन किती वाढले
बघूनच मी ते ताडले ।
खाण्यावर कुठे निबंध
दिसेल त झाडले ।
उरवायचे कशास काही
पोटात सारेच धाडले ।
हळू हळू झाले मोठे
नाही कुणीच छेडले ।
रोजच खाण्याची मौज
इंच इंच कसे जोडले ।
कमी करतोच कुठे
काम सारेच सोडले ।
वजन गेले हो वाढून
कसेच हे हो घडले
विचारूच नका आता
किती फटाके फोडले ।
Sanjay R.
नको आता वाद
करू या संवाद ।
हाक देताच मी
देशील तू साद ।
ओ ऐकण्या तुझा
करील मी नाद ।
मन होईल शांत
ऐकुनी प्रतिसाद ।
नसेल मग काळजी
मिळे मनास मिजाद ।
तुझी माझी जोडी
घेऊ जीवनाचा स्वाद ।
काय करायचे ठरलेच नव्हते
उलटे घडणार ठाऊक होते ।
दोष कुणाचा या नशिबाचा
सरले सारेच नाते गोते ।
दिवस सम्पता अंधार होता
घेऊन प्रकाश चांदणी येते ।
चन्द्र कुठला अमावसेचा
तुटून मग ती तारा होते ।
Sanjay R.