Friday, December 10, 2021

वजन किती वाढले

वजन किती वाढले
बघूनच मी ते ताडले ।
खाण्यावर कुठे निबंध
दिसेल त झाडले ।
उरवायचे कशास काही
पोटात सारेच धाडले ।
हळू हळू झाले मोठे
नाही कुणीच छेडले ।
रोजच खाण्याची मौज
इंच इंच कसे जोडले ।
कमी करतोच कुठे
काम सारेच सोडले ।
वजन गेले हो वाढून
कसेच  हे हो घडले
विचारूच नका आता
किती फटाके फोडले ।
Sanjay R.


काय तुझा अबोला

काय तुझा हा अबोला
छळतो एकांत मजला ।
शब्दात तुझ्या काय जादू
सांगू कसे मी तुजला ।
शब्दात तुझ्या मी शोधतो
का माझ्याच मी मनाला ।
आठवून मग शब्द सारे
निजतो ठेऊन उश्याला ।
बघतो स्वप्नात मग सारे
कळते सारेच निषेला ।
पहाटेचा सूर्य बघून कळते
नव्हते कोणीच उषेला ।
Sanjay R.

Thursday, December 9, 2021

नको करू वाद

नको आता वाद
करू या संवाद ।
हाक देताच मी
देशील तू साद ।
ओ ऐकण्या तुझा
करील मी नाद ।
मन होईल शांत
ऐकुनी प्रतिसाद ।
नसेल मग काळजी
मिळे मनास मिजाद ।
तुझी माझी जोडी
घेऊ जीवनाचा स्वाद ।


Wednesday, December 8, 2021

घडले उलटे सारे

काय करायचे ठरलेच नव्हते
उलटे घडणार ठाऊक होते ।

दोष कुणाचा या नशिबाचा
सरले सारेच नाते गोते ।

दिवस सम्पता अंधार होता
घेऊन प्रकाश चांदणी येते ।

चन्द्र कुठला अमावसेचा
तुटून मग ती तारा होते ।
Sanjay R.


नको रडवू

काय अडवू काय घडवू
शिल्प नाही काय जडवू ।
दुःखाचा तर सागर इथे
नको रे असा मला रडवू ।
शब्दांचे तुझे बाण अपुरे
पुरणार नाही, नको लढवू ।
मूर्ख नाहीच कोणी इथे रे
शहण्यासही तू नको फसवू ।
जगणे आता कठीण किती रे
चल दोघेही जगास हसवू ।
Sanjay R.