मनात विचारांचा वाद
वाटते आशेची साद ।
अंतरात उठतो नाद
हृदयाची मिळते दाद ।
लागते वेड मनाला
होते मग ते आजाद ।
भरतो श्वास उरात
किती किती तो आल्हाद ।
येतो परतून घरट्यात
जीवनाशी चालतो संवाद ।
Sanjay R.
पडशील ना भाऊ
तू गडगडत ।
रचशील सांग किती
तू रे खलबत ।
ठेव स्वार्थ बाजूला
पी थोडं सरबत ।
डोकं होऊ दे शांत
विचार कर अलबत ।
विजयी तूच होशील
सर होईल पर्वत ।
Sanjay R.
नको सांगूस तू
मज आता काही ।
काय या मनात तुझ्या
का कळत नाही ।
होतो मी शोधत कुठे
भटकलो दिशा दाही ।
होती मनात आस जी
झाले हृदय त्राही त्राही ।
गवसले मज ते सारे
ओंजळीत सारे काही ।
कळले तुझ्या विना मी
तर काहीच नाही ।
Sanjay R.
नको मनात आता हेवा
कुठला कशाचा दावा ।
वेदना किती या मनात
अबोल झाला पावा ।
सुचेना मजला काही
करू कुणाचा धावा ।
तुझ्या विना कोण माझा
पूजा मांडली रे देवा ।
मागतो शेवटचे आता
अंतरात एक दीप लावा ।
Sanjay R.