Thursday, November 18, 2021

नको सांगूस तू

नको सांगूस तू
मज आता काही ।

काय या मनात तुझ्या
का कळत नाही ।

होतो मी शोधत कुठे
भटकलो दिशा दाही ।

होती मनात आस जी
झाले हृदय त्राही त्राही ।

गवसले मज ते सारे
ओंजळीत सारे काही ।

कळले तुझ्या विना मी
तर काहीच नाही ।
Sanjay R.



Wednesday, November 17, 2021

अंतरात एक दीप लावा

नको मनात आता हेवा
कुठला कशाचा दावा ।
वेदना किती या मनात
अबोल झाला पावा ।
सुचेना मजला काही
करू कुणाचा धावा ।
तुझ्या विना कोण माझा
पूजा मांडली रे देवा ।
मागतो शेवटचे आता
अंतरात एक दीप लावा ।
Sanjay R.


Saturday, November 13, 2021

अमृता परी गोड

अमृतापरी गोड
नाम तुझे देवा ।
नावात तुझ्या वाटे
जीवनाचा ठेवा ।
नको आम्हा काही
नको आम्हा मेवा ।
स्मरण तुझेच असू दे
नको कसला हेवा ।
भक्ती विना नको काही
हवी तुझीच सेवा  ।
भक्तीत तुझ्या रंगू दे
हवा तूच आम्हा देवा ।
Sanjay R.


सात स्वरांची मैफिल

सात स्वरांची सजता मैफिल
तबला देतो सुरांना ताल ।

नाद उठतो होऊनिया मधुर
तंबोराही मग छेडतो तान ।

हार्मोनियमची तऱ्हाच न्यारी
सुरात मिळते अवघे गान ।

ओठातूनही स्वर निघती
मैफिल बहरते अशी छान ।

श्रोताही मग मुग्ध होतो ।
करतो वाहवा होऊन लहान ।
Sanjay R.

Friday, November 12, 2021

रात्र काळी अंधार झाला

झाले गेले हो सरले सारे
आकाशातही नाहीत तारे ।

रात्र काळी अंधार झाला
करेल कोण कुणास इशारे ।

हलत नाहीत झाडे झुडपे
का कशाला थांबले वारे ।

घाला कुणी हो फुंकर जरा
वाटते जीवन आता खारे ।

आनंदच गेला निघून सारा
होणार कधी हे सारेच बरे ।
Sanjay R.