झाले गेले हो सरले सारे
आकाशातही नाहीत तारे ।
रात्र काळी अंधार झाला
करेल कोण कुणास इशारे ।
हलत नाहीत झाडे झुडपे
का कशाला थांबले वारे ।
घाला कुणी हो फुंकर जरा
वाटते जीवन आता खारे ।
आनंदच गेला निघून सारा
होणार कधी हे सारेच बरे ।
Sanjay R.
झाले गेले हो सरले सारे
आकाशातही नाहीत तारे ।
रात्र काळी अंधार झाला
करेल कोण कुणास इशारे ।
हलत नाहीत झाडे झुडपे
का कशाला थांबले वारे ।
घाला कुणी हो फुंकर जरा
वाटते जीवन आता खारे ।
आनंदच गेला निघून सारा
होणार कधी हे सारेच बरे ।
Sanjay R.
केला मी निर्धार आता
पुरे झाल्या पोकळ बाता ।
दूर तिकडे जाऊ कुठे
मिळेल काय जाता जाता ।
वाट ही कुठवर जाते
शब्द सरले गाता गाता ।
सरेल हे सारेच एकदा
उरेल काय हातही रिता ।
Sanjay R.
समजावू कसे मनाला
का कळेना कुणाला ।
भाव अंतरात माझ्या
तेरी सुचेना मनाला ।
शर्थीने करतो यत्न
घोर किती जीवाला ।
नशीबच आहे फुटके
नाही यशच कशाला ।
अर्थाचा होतो अनर्थ
सांगू काय अशाला ।
होऊ दे दफन सारे
करील अमृत विषाला ।
Sanjay R.