Wednesday, November 10, 2021

थोडं हसू द्या ना

चला चला याना थोडं हसू द्याना
गालावर हास्य थोडं फुलू द्याना ।

हसताना कधी दिसतात हो दात
लपविण्या साठी जुळतात हात ।

कधी हलतात नुसतेच हे ओठ
खळखळून हसताना हलते ना पोट ।

हा हा करतो आवाज किती मोठा
मात्र हसतो तो कधी खोटा खोटा ।

हसायला काय हवे ते तर सांगा
मनाशीच मनाचा घालायचा दंगा ।

हवा थोडा आनंद जरासा उत्साह
अंतरातला मग निघतो ना हो दाह ।

हसा थोडे आणि मग हसतच राहा
जीवन हे छान किती जरा तुम्ही पहा ।
Sanjay R.


अनमोल आनंद

विसरून हे दुःख सारे
या आनंदात डुबु चला ।

सागर आनंदाचा खोल
जीवनात आनंद अनमोल ।

सुखी जीवनाचा मंत्र हाच
जीवनभर आनंद तर हवाच ।

आनंद देई सुखाचा वारा
सरेल मग दुःखाचा पसारा ।
Sanjay R.


सुगंध दरवळला

कळ्यांची झाली फुले 
दूर सुगंध दरवळला ।
हळुवार सुटला वारा
पानाफुलात सळसळला ।
सागरास आली भरती
होवुन लाट खळखळला ।
आनंद मावेना गगनी
जणू उत्साहच फळफळला ।
Sanjay R.

Monday, November 8, 2021

साथ

नाते जिवाभावाचे
सहजच मिळते साथ ।

मैत्रीचे हे नाते घट्ट
नेहमीच मिळतो हात ।

सुख असो वा दुःख
मदतीला नसते वाट ।

तुटत नाही कधीच
आयुष्यभर ही गाठ ।
Sanjay R.


नको कलह नको वाद

नको कलह नको वाद
 नकोसा असतो तो नाद ।

मनात असते नेहमीच आस
प्रेमाला हवी फक्त साद ।

थोडेच घ्या थोडेच द्या
नेहमीच मिळेल मग दाद ।
Sanjay R.