Tuesday, October 26, 2021

" भीती आम्हास कुणाची "

भीती आम्हास कुणाची
वाटे आमच्याच मनाची ।
अंतरात दडून सारे
येते आठवण तयाची ।

भीती दाखवी कोणी कधी
दयनीय स्थिती हृदयाची ।
लागे मग सदा काळजी
मंद गती होई श्वासांची ।

नको दाखवू तू रे भीती
सावली तुजवर स्वार्थाची ।
निर्भय आम्ही झालो आता
भीती न उरली चरितार्थाची ।
Sanjay R.


Monday, October 25, 2021

कशास म्हणू मी माणुसकी

कशास म्हणू मी माणुसकी
नि कशास न म्हणू ।
स्वार्थाने तर भरले डोके
हवा पैसा तो कुठून आणू ।

हवे थोडे सुख समाधान
अर्ध्यावरती कसा माणू ।
बघतो मी मग जमेल तिकडे
घेतो काढून जसा माझाच जणू ।

दुःख कशाचे सुख भोगतो
आनंदाला का उगाच ताणू ।
कलंक असू द्या माथ्यावरती
भूषण मजला त्याचेच म्हणू ।
Sanjay R.


" हवी साथ मला "

हवी साथ मला
हवा हात मला ।
नको एकटेपणा
सांगू कसे तुला ।

आठवतात क्षण ते
हसवायचो मी तुला ।
इश्य तुझ्या गालावर
लाजवायचो मी तुला ।

लटकाच तुझा राग
व्हायचा मग अबोला ।
वेन्धळा मी हा असा
फसायचो मीच तुला ।

तुझ्याविना करमेच ना
विसरेल कसा मी तुला ।
आठवणींच्या सागरात
काठ हवा तुझा मला ।
Sanjay R.


" भावनांचा खेळ सारा "

भावनांचे खेळ सारे
हवेहवेसे सुखाचे वारे ।

काळोख गर्द दाटता
लुकलूक करती तारे ।

आभास जसा होई
चाले कुणास इशारे ।

जगतो चन्द्र रात्रीचा
चांदण्या देती पहारे ।

आली थंडी आता
येई अंगावर शहारे ।
Sanjay R.

Sunday, October 24, 2021

" विचारांचे करूच काय "

विचारांचे आहेच काय 
काहीही येतील ते मनात ।
विळून जाते आभाळ सारे
पाऊस पाडून एक क्षणात ।

नको नको ते विचार येई
असेल नसेल जे जे ध्यानात ।
मनही पोचते मग चंद्रावर
कधी तरंगते त्या गगनात ।

होते कधी उलथापालथ
नसते कुठे काहीच कशात ।
सारेच मिळते जगायाला
बघतो मी जेही स्वप्नात ।

तुटून जाते स्वप्न मधेच
राहते सारेच मग हृदयात ।
उदास होते मनही मनात 
अश्रू दिसती या डोळ्यात ।
Sanjay R.