Monday, October 25, 2021

" हवी साथ मला "

हवी साथ मला
हवा हात मला ।
नको एकटेपणा
सांगू कसे तुला ।

आठवतात क्षण ते
हसवायचो मी तुला ।
इश्य तुझ्या गालावर
लाजवायचो मी तुला ।

लटकाच तुझा राग
व्हायचा मग अबोला ।
वेन्धळा मी हा असा
फसायचो मीच तुला ।

तुझ्याविना करमेच ना
विसरेल कसा मी तुला ।
आठवणींच्या सागरात
काठ हवा तुझा मला ।
Sanjay R.


" भावनांचा खेळ सारा "

भावनांचे खेळ सारे
हवेहवेसे सुखाचे वारे ।

काळोख गर्द दाटता
लुकलूक करती तारे ।

आभास जसा होई
चाले कुणास इशारे ।

जगतो चन्द्र रात्रीचा
चांदण्या देती पहारे ।

आली थंडी आता
येई अंगावर शहारे ।
Sanjay R.

Sunday, October 24, 2021

" विचारांचे करूच काय "

विचारांचे आहेच काय 
काहीही येतील ते मनात ।
विळून जाते आभाळ सारे
पाऊस पाडून एक क्षणात ।

नको नको ते विचार येई
असेल नसेल जे जे ध्यानात ।
मनही पोचते मग चंद्रावर
कधी तरंगते त्या गगनात ।

होते कधी उलथापालथ
नसते कुठे काहीच कशात ।
सारेच मिळते जगायाला
बघतो मी जेही स्वप्नात ।

तुटून जाते स्वप्न मधेच
राहते सारेच मग हृदयात ।
उदास होते मनही मनात 
अश्रू दिसती या डोळ्यात ।
Sanjay R.

Saturday, October 23, 2021

" परिपाठ तोच "

काळ भुताचा असो
वा असो भविष्याचा ।
परिपाठ तर आहे तोच
सम्पूर्ण या जीवनाचा ।
दोष काही आहे यात
आपल्याच नशिबाचा ।
हसतो थोडे रडतो थोडे
आनंद त्यात जगण्याचा ।
दुःखात बघतो मी सुख
खेळ सारा आहे मनाचा ।
Sanjay R.


" कसा विसरायचा भूतकाळ "

कसा विसरायचा भूतकाळ
आठवणींचा तो जाळ ।
एक एक आठवण तूझी
रात्रीची होते मग सकाळ ।
अस्वस्थ होते मग मन 
वाटते तुटलीच कशी ही नाळ ।
सोबत वाटायची तुझी
डोक्यावर रक्षक हे आभाळ ।
ढगातून बरसते पाणी जेव्हा
वाजतात घण घण सारे टाळ ।
नमते मस्तक खाली
का नात्याला नात्याचाच विटाळ ।
Sanjay R.