देऊ नकोस वेदना
करू किती मी सहन ।
झाले दुःख अपार
होईल कधी हे दहन ।
वेचतो आता मी
माझ्यासाठीच सरण ।
नाही विश्वास उरला
झाले सुखाचे हरण ।
अंतरात बघ वाकून
तिथे दुःखाचे भरण ।
भरला कुंभ शिगेला
उरले आता मरण ।
Sanjay R.
कोणी असो नसो
असते सोबत सावली ।
बाळाच्या मागे पुढे
सदा असतेच माऊली ।
भाव तुझ्या चरणी माते
संकटात तू मज पावली ।
येता प्रसंग किती कसाही
मदतीसही तूच धावली ।
गातो मी जयकार तुझा
भक्त तुझा मी माऊली ।
कृपा हवी तुझीच माते
सदा असू दे सावली ।
Sanjay R.